काथर्दे दिगर येथील देशपालसिंग गिरासे व खंडुसिंग गिरासे सैन्य दलातून सेवानिवृत्त; ग्रामपंचायतीतर्फे सत्कार

शहादा (प्रतिनिधी रामेश्वर गिरासे) : तालुक्यातील काथर्दे दिगर येथील देशपालसिंग गिरासे व खंडुसिंग गिरासे हे १८ वर्षांची देशसेवा सैन्य दलाला समर्पित करत ३० सप्टेंबर २०२१ रोजी सेवानिवृत्त झाले त्यासाठी गुरुवारी ग्रामपंचायतीमध्ये गावकऱ्यांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.

देशपालसिंग गिरासे आसाम तर खंडुसिंग गिरासे हे नाशिक येथे इंडियन आर्मी एविएशनमध्ये नियुक्ती झाली होती या दोन्ही जवानांनी जानेवारी २००३ साली पहिल्याच प्रयत्नात यश संपादन करून १८ वर्ष देशसेवेत होते या १८ वर्षांच्या देशसेवेत असतांना श्री खंडुसिंग गिरासे यांनी दोन बेस्ट अवार्ड मिळवून दाखवले पहिला अवार्ड २०१३ मध्ये चिफ ऑफ आर्मी स्टाफ गण बिक्रमसिंग फ्लाईट सेफ्टी अवार्डनी तर, २०१६ मध्ये एक हेलिकॉप्टर ब्लेडमध्ये क्रेक फाईंड केले म्हणून या उत्कृष्ट कामगिरीबद्दल डायरेक्टर गणकडून मेडल देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

sainik-satkar

या दोन्ही जवानांनी १८ वर्षांची देशसेवा सैन्य दलाला समर्पित करत सेवानिवृत्त झाले त्यासाठी गावकऱ्यांनी कौतुक केले व ग्रामपंचायत येथे सत्कार करण्यात आला यावेळी ग्रामसेवक एस.आर.सरदार, पोलीस पाटील कोमलसिंग गिरासे, गोरख भिल, गु्लझारसिंग गिरासे व गावकरी उपस्थित झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here