दारुड्या मुलाने ६० वर्षीय आईची केली हत्या; पुण्यात खळबळ

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : दारुड्या मुलाने पैसे न देणाऱ्या ६० वर्षीय आईचा लोखंडी सळई व हातातील कड्याने मारहाणकरून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील सिंहगड रोड भागात ही घटना घडली आहे. पोलिसांनी मुलाला अटक केली आहे.

विमल दत्तोपंथ कुलथे (वय ६०, रा. नर्हे) असे खून झालेल्या आईचे नाव आहे. याप्रकरणी मुलगा सचिन कुलथे (वय ३२) याला अटक केली आहे. याबाबत मुलगी अनिता चिंतामणी यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन याला दारूचे व्यसन आहे. तो सतत दारू पित असे. काम धंदाही करत नव्हता.

दरम्यान, त्याने आईकडे पैसे मागितले होते. तो दारू पित असल्याने त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. यावेळी रागात सचिन याने आईच्या डोक्यात लोखंडी सळई व हातातील कड्याने मारहाण केली. त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, हा प्रकार ऐन दसऱ्या दिवशी उघडकीस आला आहे. तक्रारदार मुलगी आईकडे गेल्यानंतर हे लक्षात आले. त्यांनी अंत्यविधी केल्यानंतर पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी मुलाला अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here