जळगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) : जिल्ह्यातील धरणगाव येथील मोठा माळीवाडा परिसरात भैया भाऊ महाजन मित्र परिवारातर्फे विद्यार्थिनींना मोफत वाह्याचे वाटप व अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोठा माळीवाडा समाजाचे अध्यक्ष विठोबा महाजन हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन माजी नगराध्यक्षा सौ.उषाताई गुलाबराव वाघ यांच्या हस्ते सावित्रीआई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी गुलाबराव वाघ यांनी मार्गदर्शन केले त्यांनी सांगितले शिवसेना 80% समाजसेवा व 20% राजकारण करते तेच कार्य भैय्या महाजन हे करित आहे त्यांना पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
प्रमुख अतिथी म्हणून शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्ष पी एम पाटील, नगराध्यक्ष निलेश चौधरी, उपनगराध्यक्ष विलास महाजन,नगरसेवक विजय महाजन,गटनेते पप्पू भावे, चंदन पाटील,लक्ष्मण पाटील, पी. टी पाटील सर, तुळशीराम महाजन,भगवान महाजन, राजेंद्र ठाकरे, राजेंद्र महाजन, माळी समाजाचे पंचमंडळ, वाल्मिक पाटील, संजय चौधरी, हेमंत चौधरी, मोहन महाजन,योगेश वाघ, प्रशांत देशमुख, रवींद्र जाधव, संतोष महाजन, विषाल महाजन, राहुल रोकडे, शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी,नगरसेवक उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते वह्या वाटप करण्यात आले.प्रास्ताविक लक्ष्मण पाटील सर यांनी केले तर सूत्रसंचालन व्ही.टी.माळी सर यांनी केले.







