“द रेपिस्ट’ला बुसान फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुरस्कार

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : अपर्णा सेन या नावाजलेल्या आणि गुणवान फिल्म डायरेक्‍टर आहेत. कोंकणा सेन शर्मा आणि अर्जुन रामपालच्याबरोबर त्यांनी केलेला ‘द रेपिस्ट’ हा त्यांच्या प्रतिभेला साजेसा चित्रपट आहे. या सिनेमाचा प्रिमिअर अलीकडेच झाला आणि अपेक्षेप्रमाणे या सिनेमाचे विश्‍लेषकांनी खूप कौतुक केले.

एका शिक्षकाने त्याच्याच विद्यार्थिनीवर बलात्कार केलेला आहे. या गुन्ह्यातून ही विद्यार्थिनी गर्भवतीही राहिलेली आहे. या गुन्ह्याबद्दल या शिक्षकाला फाशीची शिक्षाही सुनावण्यात आली आहे.मात्र, आपल्या हातून हा गुन्हा का घडला हे त्याला पीडित विद्यार्थिनीला सांगायचे असते, हे या सिनेमाचे सार आहे. थिएटर पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर व्यावसायिक सिनेमाचे काम तर सुरू झाले, पण सामाजिक आशय असलेल्या सिनेमांना पुन्हा नवसंजीवनी देण्याचे काम या सिनेमातून घडले आहे.

बुसान इंटरनॅशनल फिल्सम फेस्टिव्हलमध्येही या सिनेमाचे खूप कौतुक झाले. इतके की या सिनेमाला कीम-जी सोक पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. ‘या दसऱ्याला याच्या इतकी आनंदाची बातमी काहीही असू शकत नव्हती.’ अशा शब्दात अर्जुन रामपालने आपला आनंद व्यक्‍त केला आहे. हा एक सामाजिक ड्रामा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here