क्रिकेटर युवराज सिंहला अटक; अनुसूचित जातीविरोधात वक्तव्य भोवले

हिसार (हरियाणा) : सोशल मीडियावर अनुसूचित जातीविरोधात वक्तव्य केल्याबद्दल हांसी पोलिसांनी शनिवारी टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगला अटक केली. ही अटक २०१९ च्या एका प्रकरणात करण्यात आली.

अटकेनंतर थोड्याच वेळात युवराजला उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जामीन मिळाला. आता हांसी पोलीस युवराज सिंगच्या विरोधात न्यायालयात चालान सादर करणार आहे. पोलिसांनी संपूर्ण प्रकरण गुप्त ठेवलं. मात्र आता हे उघड झालं आहे. “जून २०२० मध्ये रजत कलसन नावाच्या व्यक्तीने युवराज सिंगविरोधात तक्रार दाखल केली होती. रजतने युवराजवर अनुसूचित जातीविरोधात टिप्पणी केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर पोलीस पथकाने तपास केला. तपासानंतर फेब्रुवारी २०२१ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी युवराज सिंगला शनिवारी चौकशीसाठी बोलावले होते. डीसीपी विनोद शंकर यांनी हिसारच्या पोलीस खात्यातील राजपत्रित अधिकाऱ्याच्या मेसमध्ये बसून युवराज सिंग यांची चौकशी केली. त्यानंतर जवाब नोंदवून घेतला. यानंतर युवराजला अटक करण्यात आली”, अशी माहिती हासी पोलिस स्थानकाचे जनसंपर्क अधिकारी सुभाष कुमार यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here