पुणे (प्रतिनिधी स्नेहा उत्तम मडावी) : इदे मिलादुन्नबीच्या मुबारक पर्व निमित्ताने रेहमत सोशल फाउंडेशचे अब्दुल बागवान यांनी मंगळवार १९ ऑक्टोबर २०२१ रोजी फ्री हेल्थ चेक-अप कॅम्प चे आयोजन केले आहे.
या कॅम्पमध्ये स्त्री रोग, अस्थि ,पोट विकार,चर्म विकार इ.वर उपचार करण्यात येणार आहे. तरी कोंढवा परिसरातील गरजुंनी निसार क्लिनिक लॅबबेक मंजिल इस्लामिया बेकरी जवळ पुणे येथे होणाऱ्या या शिबिराचा लाभ घ्यावा.
अब्दुल बागवान” हे नेहमीच विविध प्रकारे जनतेची सेवा करीत असतात.अतोनात परिश्रम घेऊन गरिब-गरजू लोकांना घर मिळवून दिली. कुठेही स्वार्थ न साधता पुढाकार घेऊन जनतेची सेवा आवर्जून करीत असतात. त्यात दवाखान्याची कामापासुन ते अंत्यविधीपर्यंत ते सारखी मदत देखील करत असतात.कोरोना काळात कोरोना किट तसेच, लागणारे इतर साहित्याचे देखिल यांनी वाटप केले आहे.नेहमीच नवनवीन उपक्रम राबवून अब्दुल बागवान हे जनतेची सेवा करीत असतात. अनेक अडचणीं वर मार्ग काढुन सामाजिक ,धार्मिक कार्यात ते हातभार लावत असतात.कोंढवा येथील लोक त्यांना खूप मान सम्मान देत असतात. त्यांच्या प्रति नेहमी लोकांना आदर वाटतो.साहेब अशीच जनतेची सेवा पुढेही करतील अशी सर्वांची सदिच्छा आहे.







