नाशिक जिल्ह्याच्या विकासात सेंद्रिय व तांत्रिक शेतीचा मोठा सहभाग

  sendirya-khate

  (इंजि.कुबेर जाधव)
  रासायनिक खत व किटकनाशकांचा अति वापरामुळे जमिनीचा पोत कमी , कमी होत असल्याने ती हळूहळू नापीक होत चालली आहे , एकीकडे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात शहरीकरणामुळे शेतीसाठी असलेले क्रुषी क्षेत्र प्रचंड प्रमाणात घटतअसुन दींवसे दीवस कमी कमी होत आहे , औद्योगिकरणाच्या नावा खाली , हजारो एकर जमीनी खरेदी केल्या जात आहेत , त्यामध्ये मोठ, मोठ्या खाजगी कंपन्या व बडे ,बडे उद्योगपती , राजकीय हस्ती यांचा सहभाग आहे , नाशिक जिल्ह्यांचा विचार करता , सिन्नर ,दींडोरी , नाशिक, इगतपुरी , त्र्यंबकेश्वर , मालेगाव तालुक्यातील फार मोठं क्षेत्र औंद्योगिक,व इतर शेतीव्यतीरीक्त कारणासाठी जमीनी खरेदी होत असल्याने शेतीखालील क्षेत्र कमी होताना पहातो आहोत.

  दळणवळणाची सोय व्हावी म्हणून देशातील सर्व जिल्हे,तालुके , एक मेकांना जोडले जात असल्याने त्यासाठी पाहिजे तसा मोबदला अदा करुन शेती योग्य , व बागायती जमिनी ताब्यात घेण्यात येतात त्यामुळे त्यांचाही परीणाम शेती क्षेत्रांवर होतों आहे, भविष्यात शेती च्या उत्तपन्नात घट होऊ शकते ,दुसरी गोष्ट पुर्वी एकत्र कुटुंब पद्धती मुळे सर्व शेती एकत्रित केली जात होती त्यामुळे एका एका घरात शेकडो पोती धान्य पिकुन साठवली जात होती , सध्या विभक्ती करणामुळे जमिनीचे तुकडे, तुकडे झाल्याने ,ती तुकड्याची शेती कसायला परवडत नसल्याने ती सोडून देण्याकडे कल वाढत चालला आहे, शेतकऱ्यांची मुले शेती सोडून छोटा ,मोठा धंदा नाही तर लहान मोठी नोकरी करून पोट भरण्यासाठी शहराकडे धाव घेऊन पोट भरण्यासाठी धरपडतो आहे.

  नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीला चांगली संधी रासायनिक खते व कीडनाशकांच्या अति वापरामुळे जमिनीचा पोत कमी कमी होत असल्याने उत्पादनात लक्षणीय घट होऊ लागली आहे, त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहण्यासाठी सेंद्रिय शेती शिवाय पर्याय नाही , विषमुक्त धाण्य, व सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या मालाला बाजारपेठत मागणी वाढत असून शहरातील जनता ज्यास्त पैसे देऊन सेंद्रिय फळे , भाजीपाला धाण्य, मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यासाठी रांगा लावताना दिसतात, नाशिक जिल्ह्यातील निफाड, दिंडोरी, इगतपुरी,कळवण, मालेगाव ,देवळा,चांदवड, बागलाण, येवला , सिन्नर येथील शेतकरी आता सेंद्रिय पद्धतीने सर्वच भाजिपाला व फळांची लागवड करुन , स्वतः विक्रीकरीता तयार झाला त्यामुळे मधल्या दलालांची दलाली कमी होउन त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळू लागला आहे , रासायनिक खते व कीडनाशकांच्या अति वापरामुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतो, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ही रसायन युक्त फळे, भाजीपाला , स्विकारला जात नसून ,जिथे पिकंतो तेथेच त्यांची योग्य तपासणी व पडताळणी करून पाठवला जातो.

  महाराष्ट्राचा विचार करता , सर्वाधिक भाजीपाला , द्राक्ष , डाळींब , कांदा, टोमॅटो , मिरची इत्यादी क्रुषी उत्तापादीत घंटक देशात वदेशाबाहेर वितरीत केली जात असल्याने आपल्या नाशिक जिल्ह्याची वेगळीच ओळख निर्माण झाली आहे ,दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे , महाराष्ट्रातुन पहीली किसान रेल्वे ही शेतमालालाची ने,आन , करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातुन सुरू करण्यात आली आहे ,ही बाब नक्कीच जिल्ह्याच्या विकासाला हातभार लावणारी आहे. फळे , भाजीपाला वर्गिय पिकांच्या निकोप वाढीसाठी १८ प्रकारच्या अन्नद्रव्यांची आवश्यकता असते साधारणतपणे ते सर्व शेंद्रीय खंतातुन उपलब्ध होत असल्याने उत्पादकांना त्यांचा कमी खर्चात चांगले उत्पादन देण्यासाठी उपयोग होउ शकतो , रासायनिक खतांचा अतिरिक वापरामुळे जमिनीतील जिव, जिवाणू चां नाश होतो,सजिव निर्मिती निर्जीव होत असल्याने दीवसे दीवस जमिनीचा पाणी साठवून ठेवण्याची क्षमता कमी होत त्या अतिरिक्त रासायनिक खतांच्या वापरामुळे क्षारयुक्त होत ,कडक बनुन हळूहळू नापीक होत चालल्या आहेत , रासायनिक खतांचा वापर करून पिकविलेली फळं भाजीपाला , द्राक्ष कांदा आदी काढणीनंतर ज्यास्त दीवस टिकून राहत नाही , सेंद्रिय खत म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतावर तयार झालेला , पालापाचोळा ,पांचट ,टरफले , शेणखत कुजवून तयार केले ले कंपोस्ट, ते खंत शेतकऱ्यांला कधीच कमी पडनार नाही , आजच्या रासायनिक शेतीच्या युगात शेती व्यवसाय किती अशाश्वत होत चाललेला आहे हे आता सर्वांनाच उमगले ले आहे , शाश्वत उत्तापादन,व मानवी आरोग्यासाठी सेंद्रिय शेती ला पर्याय नाही.

  परदेशात आज सेंद्रिय शेतीमध्ये पिकविलेल्या मालाच्या खरेदी , विक्री करीता स्वतंत्र बाजार व्यवस्था तयार झालेल्या आहेत ,त्यापद्धतिने आपल्या कडेही पुणा , मुंबई , नागपूर, नाशिक या मेट्रो व शहरात भविष्यात फक्त सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या मालासाठी moll उभे राहतील अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. सेंद्रीय शेती ही निसर्गाशी सुसंवाद ठेवूनच करायला हवी , निसर्गाच्या विरोधात जाऊन पिकांची लागवड न करता त्या त्या भागात त्या त्या वातावरणात जे मानवेल तशीच पिकांची लागवड करावी , रासायनिक खतांचा वापर बंद करून जैविक खते व कीडनाशकांचा वापर करावा , जमिनीकरीता, अन्न, वस्त्र , आणि निवारा म्हणून सेंद्रिय आच्छादनाचा वापर करावा शेती च्या आजुबाजुला असलेल्या मोकळ्या जागेत मोठ्या झांडाची लागवड करावी , इत्यादी महत्त्वाच्या तत्त्वावर सेंद्रिय शेती आधारित असुन त्याचा ज्यास्तीत ज्यास्त वापर व्हावा.

  शेती माल, भाजीपाला दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शितग्रुह , उभारण्यात आली असली तरी त्यांचं प्रमाण अल्प आहे त्यातले बरेचशे सहकार तत्वावरउभे केलेले काही काळाने बंद च झाली, ताजा व फ्रेश भाजीपाला तयार करण्यासाठी जिल्ह्यातील अनेक शेतकरी भुमिपुत्रा नि ग्रिन हाऊसेस उभी केली आहेत त्याचा फायदा अनेक शेतकऱ्यांना होत असल्याने त्यांनी पिकविलेला ताजा व फ्रेश भाजीपाला व फळे परदेशी ग्राहकांच लक्ष वेधून घेत आहे , राज्यात मोठ्या प्रमाणात फळबागांची लागवड होत असल्याने शेतकरी आपला भाजीपाला ,फळे काही काळ शितग्रुहात स्टोअर करून योग्य वेळी बाहेर मागणी असेल तेव्हा विकु लागला आहे , त्याकरिता शासनाने फलोत्पादन अभियानांतर्गत विवीध यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी पुढाकार घेऊन ज्यास्तीत ज्यास्त शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्याची गरज आहे.

  (लेखाचे लेखक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक आहेत. संपर्क मो,नं,,९४२३०७२१०२)


  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here