कारंजा (तालुका प्रतिनिधी हफीज खान) : मागील दोन वर्षांपासून कोरोना महामारीने संपूर्ण जनजीवन प्रभावित झाले असून या महामारीत खूप मोठ्या प्रमाणात जीवित हानी झालेली आहे.कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना केलेली असून या भयंकर संक्रमनापासून सर्वांचे रक्षण व्हावे यासाठी व्यापक प्रमाणात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.लसीकरण मोहीम यशस्वी व्हावी यासाठी शासनाकडून समाजाच्या सर्व स्तरापर्यंत लसीकरणाचे महत्व व आवश्यकता पटवून देण्यात येत आहे.
लसीकरणा बाबत जनमानसात असलेला गैरसमज दूर व्हावा यासाठी लसीकरणाचे महत्व मुस्लिम समजा मध्ये पटवून देण्यासाठी मुस्लिम समाजाचे धर्मगुरू यांचे प्रमुख उपस्थितीत स्थानीय नगीना मस्जिद व जामा मस्जिद या ठिकाणी जनजागरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कारंजा उपविभागीय महसूल अधिकारी राहुल जाधव यांनी उपस्थितांना कोरोना प्रतिबंधक उपाय योजना अंतर्गत लसीकरणाचे महत्व व आवश्यकता या विषयी मार्गदर्शन केले तसेच कोरोना प्रतिबंध लस घेतल्यामुळे कोणत्याही प्रकारचा जीवित्वाला धोका नसून सर्वांनी या लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन हाफिज सैय्यद अहेमद यांनी केले.
या प्रसंगी उपविभागीय महसूल अधिकारी राहुल जाधव यांचे सह मंडळ अधिकारी वक्ते, नगीना मस्जिद मुतवल्ली हाजी नूरमोहम्मद अकबानी, नगीना मस्जिद इमाम व खतीब हाफिज सैय्यद अहेमद,नगीना मस्जिद सचिव हाजी मो शफीसेठ पुंजानी,हाजी इम्तियाज सेठ मालानी,जामा मस्जिद इमाम मौलवी अ मजीत,मुफ्ती ए बरार मौलवी अ रशीद,काजी इक्बाल,एम टी खान,युवा सामाजिक कार्यकर्ता जाकीर शेख,हाजी बाबू चाऊस,इकराम सर,सै अब्रार अहेमद,सलीम अकबानी,काजी एजाज,राजुसेठ मरछिया,रहेमत बेग मिर्झा आदी उपस्थित होते.






