कोरोनामुक्त धरणगावकरिता तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा

धरणगांव (योगेश पी पाटील) – तालुक्यात कोविड रुग्ण बरे होण्याची संख्या झपाट्याने वाढत असून तालुक्यात जे कोविड सेंटर आहेत त्या ठिकाणी चांगल्या सुविधा पुरविण्यात जात असून शहरातील कोविड सेंटर मध्ये मार्च महिन्या पासून एक कोविड रुग्णाचा मृत्यू झाला नाही ही एक समाधानाची बाब आहे
आपला तालुका कोविड मुक्त करावयाचा असून त्या साठी आपल्याला सर्व पदाधिकाऱ्यांना वेगाने काम करावे लागणार आहे. जवळ जवळ 2167 चाचण्या आपल्या तालुक्यात झाल्यात रॅपिड 524,स्वॅब 1643, कोविड पॉझिटिव्ह पैकी 461 हे बरे झाले आहे 1536 निगेटिव्ह आले. जास्त टेस्ट होत असल्यामुळे रुग्ण संख्येत कमी-अधिक प्रमाणात वाढ होत आहे रुग्णांची प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी त्यांचे मनोधैर्य उचंवण्यासाठी यंत्रणा चांगले काम करीत आहे
पारोळा येथील योगा शिक्षकाने 7 ऑगस्ट रोजी सर्व रुग्णांना खुल्या मैदानात योगाचे प्रशिक्षण दिले व त्यांना सांगितले घाबरण्याचे काही कारण नाही. जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, प.स.सभापती मुकुंद नन्नवरे,उपजिल्हा प्रमुख पी एम पाटील सर,माजी नगराध्यक्ष सुरेश नाना चौधरी,न.पा.गट नेते पप्पू भावे,विजू महाजन,वासुदेव चौधरी,शहर प्रमुख राजेंद्र महाजन,प.स.सदस्य प्रेमराज पाटील,दिपक सोनवणे,आसाराम कोळी,विलास महाजन, राजेंद्र ठाकरे,छोटु जाधव,धीरेंद्र पुरभे,हेमंत चौधरी,नारायण महाजन यांच्याशी चर्चा करून जी ही काही कोविड रुग्णांसाठी मदत लागत असेल त्यासाठी तुम्ही मदत करा व तालुक्यात एक टीम तयार करून ज्या ज्या ठिकाणी जास्तीचे रुग्ण आढळून येथील त्या ठिकाणी जन जागृती करून तेथील ग्रामस्थांना मार्गदर्शन करा
धरणगाव तालुका हा कोरोना मुक्त कसा होईल यासाठी धरणगाव तालुक्यातील सर्वच पदाधिकाऱ्यांनी अहोरात्र प्रयत्न करण्याचे आवाहन पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here