जळगांव (संपादक सुनिल पाटील) – जनमत प्रतिष्ठान व कुणाल जडे मार्फत जळगावातील कोविड चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी
शहरातील जनमत प्रतिष्ठान व कुणाल संजय जडे यांच्याकडून विविध ठिकाणी सॅनिटायझेशन करण्याचा उपक्रम सुरु आहे.
आज (दि.८) जनमत प्रतिष्ठान व कुणाल जडे यांनी भगीरथ इंग्लिश स्कूल व एमआयडीसी पोलीस स्टेशन संपूर्णपणे सॅनिटायजेशन करण्यात आले. यावेळी शिक्षक भारती संघटनेच्या अध्यक्ष शितल ताई जडे, कुणाल जडे, हर्षाली पाटील, जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले व कुणाल जडे आदी उपस्थित होते.
कोरोना फायटर : पंकज नाले
आज सारे विश्व कोरोना राक्षस महामारीने त्रस्त आहेत , बेचैन आहेत. कोरोनाने साऱ्या जगावर थैमान घातलेले आहे. या दृष्ट
महामारीत अनेक जनांचे प्राण गेलेले आहे. काही झुंज देत आहे. या भयाणक प्रसंगी जो तो आपल्या परीने मदत , सहकार्य करीत आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता काही फायटर , योध्दा ग्रेट काम करतांना दिसत आहे . असाच एक योध्दा व जनमत प्रतिष्ठान या सामाजिक , सेवाभावी संस्थेचा अध्यक्ष श्री पंकज नाले हा दिवसभर सेवा करतांना दिसत आहे. कार्यालय , ऑफिस तो पदर मोड करुन सॉनिटायझर करुन देत आहे. फार मोठे काम जनमत प्रतिष्ठान व त्यांचे सर्व सहकारी करत आहे. गल्लीबोळात जाऊन , तिथं विचारपूस करुन , ज्यांना हवं ते देऊन सहकार्य करत आहे.पंकज नाले व त्यांची सर्व टिम, कार्यकर्ते कौतुकास पात्र आहेत. अशा सेवाभावी योध्दांचा आभिमान वाटतो .
– अशोक पारधे सर , जळगाव
Home उत्तर महाराष्ट्र जळगाव जनमत प्रतिष्ठानतर्फे भगीरथ स्कूल व एम.आय.डी.सी.पोलीस स्टेशनला सॅनिटायजेशन







