इलिनॉय (अमेरिका) : येथे एका २८ वर्षीय महिलेने किस करायला नकार दिला म्हणून संतप्त होत एका व्यक्तीला गोळ्या घालून ठार मारले.
शिकागो सन-टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, क्लाउडिया रेसेंडिझ-फ्लोरेस एका जोडप्यासह एका अपार्टमेंटमध्ये हँग आउट करत होती आणि मद्यपान करत होती. मद्यपान करत असताना रेसेंडिझ-फ्लोरेजने २९ वर्षीय जेम्स जोन्सला चुंबनासाठी विचारले,त्याने नकार दिला आणि तो त्याच्या प्रेयसीकडे वळला आणि तिला चुंबन देण्यास सुरुवात केली, त्यामुळे रेसेन्डिझ-फ्लोरेसला त्याचा राग आला,
रेसेन्डिझ-फ्लोरेसनंतर अधिक आक्रमक झाली आणि पुन्हा एकदा जेम्सकडे चुंबन मागितले. जेव्हा जेम्सने पुन्हा नाही म्हटले, तेव्हा संतापलेल्या रेसेंडिझने दोन पलंगाच्या कुशन्समध्ये ठेवलेली बंदूक काढून त्याच्यावर गोळ्या झाडल्या, असे तिच्या वकिलांनी सांगितले.






