ईद-ए-मिलादनिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे तांबापुरा येथील मुलांना खाऊ वाटप

जळगाव (क्राइम रिपोर्टर जमील शेख) : इस्लाम धर्माचे सर्वश्रेष्ठ असे हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती म्हणून ईद-ए-मिलाद साजरी केली जाते. या पवित्र दिवशी तांबापुर परिसरातील लहान मुलांना आरपीआय युवक महानगर अध्यक्ष मिलिंद सोनवणे यांच्यातर्फे खाऊ वाटप करण्यात आले.

प्रत्येक लहान मुलात ईश्वर असतो, या ब्रीदास अनुसरुन या पवित्र दिवसाचा आनंद अनावश्यक खर्च न करता, लहान मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवत साजरा करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्म रबीउल अव्वल महिन्याच्या बारा तारखेला साजरा करण्यात येतो. सन 571 ला हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्म मक्का येथे झाला. मोहम्मद पैगंबर हे अल्लाहचे अंतिम प्रेषित होते. इस्लामच्या धारणेनुसार अल्लाहने त्यांच्यामार्फत कुराण हा धर्मग्रंथ लोकांपर्यंत पोहोचवला. त्यामुळे त्यांना नबी रसूल आदी नावांनीही संबोधित केले जाते. इस्लाम मध्ये ईद-ए-मिलाद हा सर्वात मोठा दिवस असल्याचे मानला जातो.

eid-a-milad-at-tambapura-jalgaon

आरपीआय युवक महानगर अध्यक्ष मिलिंद सोनवणे यांच्या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनी स्वागत करत त्यांचे आभार मानले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here