मुस्लिम सेवा संघाचा महिला बचत गट धरणे साखळी आंदोलनाला पाठिंबा

जळगाव (क्राइम रिपोर्टर जमील शेख) : महाराष्ट्रातील महिला बचत गटांचे, मायक्रो फायनान्स चे कर्ज माफी मिळण्याबाबत धरणे साखळी आंदोलनाचा आज आठवा दिवस आहे.

आज मुस्लिम सेवा संघाच्या महिला जिल्हा अध्यक्ष फिरोजा शेख जळगाव यांनी महाराष्ट्रातील महिला बचत गटांचे, मायक्रो फायनान्स चे कर्ज माफी मिळण्याबाबत धरणे साखळी आंदोलनाला पाठींबा दिला.

यावेळी बोलतांना त्या म्हणाल्या, की आम्ही आवाहन करतो, ज्या ज्या सामाजिक संस्था, व्यक्ती, समाजसेवक यांना महाराष्ट्रातील महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी आमचे आंदोलन योग्य वाटत असेल त्यांनी प्रत्यक्ष येऊन पाठिंबा द्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here