कोल्हापुर येथे होणार ३२ व्या वरिष्ठगट राज्यस्तर फेन्सिंग (तलवारबाजी) अजिंक्यपद स्पर्धां

कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) : राष्ट्रीय तलवारबाजी संघटनेचे उपाध्यक्ष व महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष ना. सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या ३२ व्या वरिष्ठगट राज्यस्तर फेन्सिंग (तलवारबाजी) अजिंक्यपद स्पर्धा येत्या २३ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत कोल्हापूरमध्ये होणार आहे. कोल्हापूर फेन्सिंग (तलवारबाजी) असोसिएशन, डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशिय सभागृहात ही स्पर्धा होणार आहे.

इपी, फॉईल व सेंबर या तीन प्रकारात होणाऱ्या या स्पर्धेत राज्यभरातील सुमारे ५०० खेळाडू सहभागी होणार आहेत. उत्तम नियोजन व आदरातिथ्य यासाठी कोल्हापूर जिल्ह्याची विशेष ओळख आहे. या स्पर्धेच्या उत्कृष्ट नियोजनातून ही ओळख अधिकच पक्की होईल, हा विश्वास आहे. राष्ट्रीय तलवारबाजी संघटनेचे उपाध्यक्ष व महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष गृह राज्यमंत्री सतेज डी. पाटील यांच्या प्रयत्नातून राज्यस्तरीय स्पर्धा आयोजनाची संधी कोल्हापूरला मिळाली आहे. यामुळे कोल्हापूरच्या क्रिडा क्षेत्राला नवी झळाळी मिळाली आहे.

यावेळी शिवाजी विद्यापीठाचे क्रीडा विभाग प्रमुख डॉ. पी. टी. गायकवाड, डी. वाय पाटील अभिमत विद्यापिठाचे कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, उपकुलसचिव संजय जाधव, क्रीडा विभाग प्रमुख डॉ. राम पवार, डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे जिमखाना प्रमुख डॉ. राजेंद्र रायकर, सामना समिती सदस्य गजानन बेडेकर, दीपक क्षीरसागर, विनोद पंडित, शिवाजी पाटील, संभाजी मिरजे, योगेश पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here