अमळनेर (प्रतिनिधी) : बारा ज्योतीर्लींगमध्ये मुख्य समजल्या जाणाऱ्या “केदारनाथ” उत्तराखंड येथे अमळनेर, धुळे, जळगाव, नंदुरबारसह खान्देशातील ५० भाविक अतिवृष्टीमुळे गेल्या ३ दिवसांपासून अडकले होते ते मंगळवारी (दि १९) रोजी १८ किमीचा पायी प्रवास करून गौरीकूंड येथे सुखरूप परतले आहेत.
अमळनेरच्या मॉ गायत्री यात्रा कंपनी तर्फे ४६ प्रवाशी चारधाम यात्रेसाठी दि ७ ऑक्टोंबर पासून रवाना झाले होते दि १७ रोजी गौरकूंड येथून केदारनाथला मंदिरात हेलीकॉप्टरने पोहचले मात्र हवामानातील बदलामुळे हेलीकॉप्टर सेवा बंद झाली व मुसळधार पाऊसामूळे रेड अॅलर्ट घोषीत झाल्याने सुमारे ६० तासांपेक्षा जास्त वेळ भाविक या ठिकाणी अडकून पडले होते
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर गेल्या २ वर्षापासून ही यात्रा बंद करण्यात आली होती यावर्षी सालाबादा प्रमाणे अक्षयतृतीयेला मंदिराचे कपाट (द्वार) ऊघडले मात्र न्यायालयाने या यात्रेवर बंदी केली होती मात्र काही नियमावली करून चारधाम यात्रा २० सप्टेंबरला सुरू झाली अमळनेरहून मॉ गायत्री यात्रा कंपनी मार्फत ४६ भाविक आयोजक नरेंद्र सोनार यांचे नेतृत्वात दि ७ ला ऊज्जैन, आग्रा, मथूरा, वृंदावन करून हरिद्वार पोहचले दि १३ ला हरिद्वारहून उत्तरख़ंडातील चार धाम यात्रेला प्रारंभ झाला गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ व बद्रीनाथ हे चार धाम असून दि ४ नोव्हेंबरला मंदिर ६ महिन्यांकरिता बंद केले जाते
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव,नासिक नंदुरबार,सूरत येथील भाविकांचा यात समावेश होता या पैकी “केदारनाथ” धाम येथे प्रचंड प्रमाणात पाऊस सुरू झाला, त्यामुळे सर्वत्र मोठ्याप्रमाणात पाणीच पाणी असल्याने व हवामानातील बदलामुळे हवाईदल वाहतूकसुध्दा बंद झाली. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र राज्यातील सुमारे ५०भाविक तेथे अडकून पडले होते उत्तराखंड शासनाकडून करण्यात येणाऱ्या राहूट्या व भोजन व्यवस्था यावर्षी बंद होती बर्फच्छादीत पर्वतामुळे याठिकाणी खाण्या पिण्याची व राहाण्याची फारशी सोय नसल्याने त्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली उत्तराखंड राज्यातील १३ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे भाविक असतील तेथेच थांबण्याचा सल्ला प्रशासनाने दिला होता.






