नाशिक (विशेष प्रतिनिधी) : दिंडोरी तालुक्यातील परमोरी गावांजवळ मोटारसायकल व ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने पित्याचा जागीच मुत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार परमोरी जवळ भीषण अपघातात पित्याचा जागीच मुत्यू तर मुलगा गंभीर झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मंगळवार दि.19 रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास दिंडोरी तालुक्यातील लखमापुर फाटा ते वरखेडा जाणाऱ्या रस्त्यावर परमोरी गावांजवळील मारुती मंदिरासमोर रोडवर टाटा कंपनीची आयशर क्रंमाक एम.एच-43 यु -7207 व बजाज प्लँटीना मोटारसायकल क्रंमाक एम.एच.-15 एच डी 3893 यांच्यात समोरासमोर अपघात होऊन अपघातात मोटारसायकल वरील मोतीराम गंगाधर गवळी ( वय -60) हे जागीच ठार झाले. व गोरख मोतीराम गवळी ( वय -40) हे गंभीर जखमी झाले. चांदवड तालुक्यातील खडकजांब येथील रहिवासी आहे.
ऐन कोजागिरी पौर्णिमेच्या गावांजवळ अपघात झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.






