लाखों रुपयांचा मद्यसाठा सोलापुरात जप्त; चार संशयित आरोपींना सोलापूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी विजयकुमार दिवाणजी) : सोलापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कुर्डवाडी शेटफळ या मार्गावर मोठी कारवाई करत एका टेम्पो आणि कारमधून स्वस्त दरात विदेशी मद्य विकत असताना कारवाई करण्यात आली. या कारवाईत २६ लाख २० हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल व तसेच मद्यसाठा जप्त करण्यात आला असून, चार संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.



सोमवारी (दि. १८) रात्री ७ ते ९.३० दरम्यान सोलापूर राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकास मिळालेल्या गोपनीय माहिती दिली होती आणि त्यानुसार सापळा लावण्यात आला. शिवप्रसाद ढाब्या समोर राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी एक टेम्पो व कार ताब्यात घेतली. त्यामध्ये १९० बॉक्स गोवा राज्य निर्मित मद्यसाठा जप्त केला. या कारवाईमध्ये विलास मोराळे, कृष्णा मुजमुळे, गणेश जाधव, मिलिंद मगरे या चार जणांना अटक करण्यात आली आहे.



गोवा राज्यातून स्वस्त दरात विदेशी दारूच्या बाटल्या खरेदी करून महाराष्ट्र राज्यात सर्रास विक्री केली जाते. यावर राज्य उत्पादन शुल्क आणि पोलीस प्रशासन पाळत ठेवून असतात. महाराष्ट्र राज्यात विदेशी मद्यावर भरमसाठ महसूल असल्याने महाराष्ट्रात दारू महाग आहे. हे दारू तस्कर मोठी कमाई करण्याच्या उद्देशाने गोवा राज्यातून विदेशी दारू अवैध रित्या महाराष्ट्रात आणतात. महाराष्ट्रातील महामार्गावर असलेल्या ढाब्यांमध्ये ही दारू विक्री केली जाते.

कुर्डवाडी-शेटफळ रस्त्यावर झालेल्या कारवाईमध्ये भरारी पथकातील निरीक्षक सुदर्शन संकपाळ, अंकुश अवताडे, दुय्यम निरीक्षक सुनील पाटील, गजानन होळकर, प्रकाश सावंत, चेतन व्हनगंटी, नंदकुमार वेळापुरे, किशोर लुंगसे, विकास वडमीले, विजय शेळके यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here