पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : ‘नील मल्टी इव्हेंट्स’ संस्थेचे ‘नील नारीशक्ती पुरस्कार २०२१-२२’ जाहीर झाले असून संगीत अभ्यासक गौरी शिकारपूर,आयुर्वेदाचार्य डॉ प्रचिती सुरु-कुलकर्णी,माध्यम तज्ञ त्रिवेणी गोस्वामी-माथूर,अभिनेत्री संयोगिता भावे आणि उत्कर्ष शिक्षण कला आणि क्रीडा मंडळच्या संस्थापिका शारदा चव्हाण यांना हे पुरस्कार देण्यात येणार आहेत.
पुरस्कार वितरण समारंभ नोव्हेंबर महिन्यात आयोजित करण्यात येणार आहे अशी माहिती ‘नील मल्टी इव्हेंट्स’ संस्थेच्या प्रमुख नीलम बेंडे यांनी दिली.पुरस्कार प्राप्त मान्यवरांच्या मुलाखती ऑनलाईन माध्यमातून घेतल्या जाणार आहेत.
‘नील मल्टी इव्हेंट्स’ या अंतर्गत गाण्याचे आणि सांस्कृतिक कार्यक्रम,गायकांसाठी सेमिनार्स तसेच महिलांसाठी सॉफट स्किल्स सेमिनार्सचे आयोजन केले जाते.स्वरलहरी,ऋतु हिरवा,इंद्रधनू,’ये रे घना’ यासारखे अनेक सांगीतिक कार्यक्रमांचे संस्था आयोजन करते.






