लोकजनशक्ती पार्टीतर्फे नाट्यगृहे,चित्रपटगृहे खुली करण्याच्या निर्णयाचे स्वागत

पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : पुण्यातील नाट्यगृहे,चित्रपटगृहे खुले करण्याच्या निर्णयाचे स्वागत लोकजनशक्ती पार्टी तर्फे करण्यात आले असून २१ ऑक्टोबर,गुरुवारी सायंकाळी ५ वाजता येरवडा येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन येथे कलाकारांना,नागरिकांना पेढे भरविण्यात येणार आहेत.

लोकजनशक्ती पार्टीचे पुणे शहर-जिल्हा अध्यक्ष संजय अल्हाट यांनी ही माहिती दिली.पक्षाचे पदाधिकारी तसेच प्रसिद्ध गायक अमर पुणेकर,गायिका कल्पना जगताप(महिला आघाडी ),विनोद धीवर(विकल्प ग्रुप),संजय चव्हाण,के.सी.पवार,अप्पा पाटील,अभिनेते प्रशांत बोगम,संतोष पिल्ले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here