दि. २२ ऑक्टोबर राशिभविष्य : साहस आणि पराक्रमाचा कारक मंगळ ग्रहाचा तुळ राशीत प्रवेशाचा होणार लाभदायी परिणाम

    मेष : आज मंगळ ग्रह तुमच्या सप्तम स्थानी राहील तर चंद्र तुमच्याच म्हणजे मेष राशीमध्ये संचार करेल. या दोन्ही ग्रहांचा तुमच्या दाम्पत्य जीवनावर परिणाम होईल. आज तुमच्या जोडीदाराला अचानक धनलाभ होऊ शकतो. कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवर चर्चा करताना आज तुम्हाला आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.

    वृषभ : वृषभ राशीतील व्यक्तींनी आज आपल्या विरोधकांपासून सावध राहण्याची गरज आहे. द्वादश स्थानी असणारा चंद्र आणि सहाव्या स्थानी असणारा मंगळ यामुळे आज तुमचे विरोधक अधिक सक्रिय होतील.

    मिथुन : मिथुन राशीतील व्यक्तिंसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुमच्या राशीतील पाचव्या स्थानी मंगळ ग्रहाचा संचार क्रीडा क्षेत्रात आणि प्रेमजीवनात तुम्हाला यशप्राप्ती करून देईल. एकादश स्थानी असणारा चंद्र करियर आणि व्यवसायाच्यादृष्टीने लाभदायी ठरेल.

     

    कर्क : आज तुम्हाला आल्या आईवडिलांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. या राशीतील काही व्यक्तींना वाहन खरेदीची संधी आज मिळण्याची शक्यता आहे. दशम स्थानी असणारा चंद्र नोकरी आणि कामाच्या ठिकाणी तुम्हाला यशप्राप्ती करून देईल.

    सिंह : नवव्या स्थानी असणारा चंद्र आणि तिसऱ्या स्थानी असणारा मंगळ यामुळे आज सिंह राशीतील व्यक्तींना कामाच्या निमित्ताने प्रवास करावा लागू शकतो. या राशीतील काही व्यक्ती आज धार्मिक कार्यात सहभागी होऊन दानधर्म करू शकतात. त्यामुळे तुम्हाला मानसिक शांती लाभेल.

    कन्या : आज आपल्या आरोग्याविषयी थोडीही बेपर्वाई करणे तुमच्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. आठव्या स्थानी असणाऱ्या चंद्रामुळे पोटाशी संबंधित विकार उद्धभवू शकतात. आज तुम्ही शरीराला थंडावा मिळवून देणाऱ्या पदार्थांचे सेवन करायला हवे.

    तूळ : तूळ राशीतील व्यक्तींनी आज आपल्या वैवाहिक जीवनात संतुलन निर्माण करण्याचा प्रयत्न करायला हवा. तुमच्या राशीमध्ये संचार करणाऱ्या मंगळ ग्रहामुळे जोडीदाराचा व्यवहार चिडचिडा बनण्याची शक्यता आहे. आज तुम्ही आपल्या जोडीदाराच्या शब्दांऐवजी त्याच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास परिस्थिती सामान्य बनू शकेल.

    वृश्चिक : आज मंगळ ग्रह तुमच्या राशीतील द्वादश स्थानी असल्याने परदेशी व्यापाराशी संबंधित व्यक्तींना आज लाभ होईल. वृश्चिक राशीतील व्यक्तींनी आज कुणावरही गरजेपेक्षा अधिक विश्वास ठेवणे शक्यतो टाळावे. एखादी जवळची व्यक्ती आज तुम्हाला धोका देऊ शकते.

    धनू : या राशीतील व्यापारी व्यक्तींना आज लाभ मिळण्याची शक्यता आहे. मेडिकल क्षेत्र, कन्स्ट्रक्शन इत्यादी क्षेत्रातील व्यक्तिंनाही आज फायदा होईल. आज चंद्र तुमच्या राशीतील पाचव्या स्थानी विराजमान असल्याने विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस सुखद राहील.

     

    मकर : या राशीतील ज्या व्यक्ती नोकरीच्या शोधात आहेत किंवा नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत त्यांचे स्वप्न आज पूर्ण होईल. तुमच्या राशीतील दहाव्या स्थानी विराजमान असलेला मंगळ ग्रह करियरमध्ये तुम्हाला यशप्राप्ती करून देईल. चतुर्थ स्थानी चंद्र असल्याने आज तुमचे कौटुंबिक जीवनही सुखद होईल.

    कुंभ : आज एखाद्या जुन्या नातेवाईक किंवा मित्रमैत्रिणीसोबत तुमची भेट घडून आल्याने तुमचा दिवस आनंदात जाईल. नवव्या स्थानी असणारा मंगळ ग्रह तुमचे मन चंचल बनवत आहे.

    मीन : आज तुम्ही आपल्या वाणीच्या जोरावर कार्यक्षेत्र आणि सामाजिक स्तरावर उत्तम परीणाम प्राप्त करण्यात यशस्वी व्हाल. आठव्या स्थानी मंगळ ग्रह विराजमान असल्याने आज तुम्हाला आरोग्याशी संबंधित काही समस्यांना तोंड द्यावे लागेल. त्यामुळे आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्या.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here