ठाणे (विशेष प्रतिनिधी सुभाष जैन) : स्वच्छंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पंचशिल विद्यालय लोकमान्य नगर पाडा नंबर ३, ठाणे येथे इ.५वी ते १०वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना ऑल कार्गोच्या नियमानुसार शैक्षणिक नियम म्हणून शिष्यवृत्ती अंतर्गत चेक वितरण कार्यक्रम नियोजित केला होता. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून ऑल कार्गोचे प्रतिनिधी नितिन कांबळे, सौ.तृप्ती ठाकूर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सौ.एस.एच. पवार यांनी स्वीकारले होते.
कार्यक्रमास मुख्य उपस्थिती म्हणून आर.टी.ओ. अधिकारी पूनम भोसले (माजी विद्यार्थीनी पंचशील विद्यालय ), तसेच संस्था हितचिंतक आर. एस. पाटील सर (माजी शिक्षण अधिकारी टि.एम.सी.), जे. बी. लोखंडे सर(संस्था हितचिंतक) व संस्थेचे संचालक एच.बी.पवार, ठाणे वैभव छायाचित्रकार सुभाष शांताराम जैन आदि उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रमाची मुख्य जबाबदारी माध्यमिक मुख्याध्यापक एच. एन. मांदळे व प्राथमिक विभागाचे प्रभारी मुख्याध्यापक के.बी. बोंडे व इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने पार पडले.विद्यार्थी, पालक व महिला मंडळ प्रतिनिधी यांची विशेष उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ.रेखा उरमोडे माध्यमिक विद्यालय यांनी केले.






