मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : आर्यन खान ड्रग्जप्रकरणी ‘एनसीबी’ने बॉलीवूड अभिनेत्री व चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे हिच्या वांद्रे येथील घरावरही आज छापा टाकला. एनसीबीने तिला समन्स बजावले. त्यानुसार काल दुपारी अनन्या एनसीबीच्या कार्यालयात पोहोचली. तिच्यासोबत चंकी पांडे हासुद्धा होता. परंतु त्याला आतमध्ये प्रवेश दिला गेला नव्हता. अनन्याची सुमारे दोन तास चौकशी करण्यात आली. तिला उद्याही चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे.
आर्यन खान याच्या मोबाईलमधील व्हॉट्सअॅप चॅटमधून अनन्याचे नाव समोर आले होते. ते चॅट ड्रग्जसंदर्भात होते असे सांगितले जाते. ते चॅट एनसीबीने बुधवारी विशेष सत्र न्यायालयातही सादर केले होते.
अधिक चौकशीसाठी एनसीबीने अनन्याच्या घरावर आज छापा टाकून तिचा मोबाईल चॅट आणि लॅपटॉप जप्त केला आहे. करण जोहरचा ‘स्टुडंट्स ऑफ द इयर 2’ हा अनन्याचा पहिला चित्रपट आहे.






