मेक्सिको सिटी : मेक्सिकन कॅरेबियन रिसॉर्ट टाऊन तुलुम येथील रेस्टॉरंटमध्ये झालेल्या गोळीबारात एका भारतीय महिलेसह दोन महिलांचा मृत्यू झाला व तीन जण जखमी झालेत, अशी माहिती वरिष्ठ अधिकार्यांनी दिली.
मृत महिलांपैकी एक जर्मनीची, तर दुसरी भारताची आहे. तीन जखमींमध्ये दोन जर्मनी व नेदरर्लंडमधील एका पर्यटकाचा समावेश आहे.इतर जखमी पर्यटकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. गोळीबार करणार्यांपैकी एक जण जखमी झाला होता व त्याला नंतर अटक करण्यात आली
तुलूमच्या मुख्य किनारपट्टीच्या भागात हॉटेलचे काही टेबल्स रस्त्याच्या कडेला होते व तिथे काही लोक जेवण करीत होते. बुधवारी रात्रीच्या सुमारास मादक पदार्थांची विक्री करणार्या दोन गटात भांडण झाले व त्यांनी एकमेकांवर गोळीबार केला. मात्र या गोळीबारात जेवण करीत असलेले दोन जण मृत्युमुखी पडले व काही जण जखमी झालेत. यात एका महिलेचा घटनास्थळी व दुसर्या महिलेचा रुग्णालयात मृत्यू झाला. .







