दिवाळीच्या तोंडावरच ‘लालपरी’ चालक जाणार संपावर; २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

मुंबई (प्रतिनिधी चेतन किर्दत) : दिवाळीच्या तोंडावरच सर्वसामान्यांची लाईफलाईन असलेली लालपरीचा प्रवास महाग होण्याच्या मार्गावर आहे. आधीच सर्वसामान्य महागाईची झालं सोसत असतानाच आता ही भाडेवाढ पुन्हा एकदा सर्वसामन्यांना धक्का बसत आहे. तर या महागाई बरोबरच दुसरीकडे एस टी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी संपाची तलवार उपसली आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ राज्य शासनात विलीन करून, लालपरीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना न्याय द्या अन्यथा संप करू असा इशारा ऐन दिवाळीच्या तोंडावर देण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी लालपरी कर्मचारी संघटनेने थेट मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे ही मागणी केली आहे . तर दुसरीकडे १७ संघटनांचा सहभाग असलेल्या संयुक्त कृती समितीने देखील लालपरी कर्मचाऱ्यांना दिवाळी अगोदर भत्ते आणि थकबाकी द्या,अन्यथा बेमुदत उपोषण करु असा इशारा सरकारला दिला आहे.

कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर तसेच नोव्हेंबर या महिन्याचे वेतन दिवाळी अगोदर देण्यात यावे, तसेच महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढीचा दर शासनाप्रमाणे लागू करून थकबाकीची रक्कम एक रकमीदेण्यात यावी या मागण्यांसाठी महामंडळातील सर्व संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने २७ ऑक्टोबर दिवशी राज्यभर बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस इंटक संघटनेचे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here