मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : राज्यातील चित्रपटगृहे उघडण्याचा निर्णय झाल्यानंतर आता सलमान खानच्या फॅन्सला प्रतिक्षा आहे ती त्याच्या आगामी अंतिम या चित्रपटाची. ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ हा चित्रपट रिलीज होण्यासाठी सज्ज झाला असून, जगभरातील चित्रपटगृहात येत्या २६ नोव्हेंबर २०२१ ला ‘अंतिम’ रिलीज होणार आहे.
या चित्रपटाचे एक मोशन पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. यात अभिनेता आयुष शर्मा खतरनाक लूक पाहायला मिळत आहे.अभिनेता आयुष शर्मा देखील सलमान खानच्या ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारत आहे.
Antim mein jab Rahul bana Rahulia theatres bhi khul gaye… #AayushAsRahulia#AayushSharma @MahimaMakwana_ @manjrekarmahesh @SKFilmsOfficial @ZeeStudios_ @ravibasrur @ZeeMusicCompany @ZeeCinema @Zee5India pic.twitter.com/OtfHRD8Gvm
— Salman Khan (@BeingSalmanKhan) October 22, 2021
सलमानने या चित्रपटाचे नुकतेच आणखी एक मोशन पोस्टर रिलीज केले आहे. यात मोशन पोस्टरमध्ये आयुष शर्मा हा शर्टलेस अवतारात पाहायला मिळत आहे. आयुषची जबरदस्त बॉडी, अॅब्स आणि मसल्सही यात पाहायला मिळत आहे. त्यासोबत त्याच्या गळ्यात सोन्याची चेन पाहायला मिळत असून त्यावर आर अक्षर असलेले लॉकेट दिसत आहे. आयुषचा हा लूक पाहून अनेकांनी खतरनाक, जबरदस्त अशा अनेक कमेंट केल्या आहेत. अंतिम मे जब राहुल बना राहुलिया, थिएटर्स भी खुल गये, असे कॅप्शन सलमानने या पोस्टरला दिले आहे.






