दोंडाईचा (संतोष कोळी) – गोर-गरीब रुग्णांना आपत्कालीन परिस्थितीत धुळ्यापर्यंत जाण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याच्या जाणिवेतून आणि शिंदखेडा येथे गोर-गरीब रुग्णांची सेवा करता यावी या उद्देशाने आमचे नेते मा.संदीप दादा बेडसे यांच्या माध्यमातून आणि शिंदखेडा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने रुग्णवाहिकेचे लोकार्पण पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून आलेले पक्षाचे निरीक्षक मा.अविनाशजी आदिक आणि अर्जुनजी टिळेकर यांच्या हस्ते करण्यात आले.व सादर वाहन शिंदखेडा तालुक्याचे तहसीलदार श्री.सोनवणे साहेब यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी दोंडाईचा शहर, शिंदखेडा तालुका आणि धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Home उत्तर महाराष्ट्र नंदुरबार शिंदखेडा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने रुग्णवाहिकेचे लोकार्पण







