मुंबई(कुलाबा) (प्रमिला जाधव) – काल (दि ८) चांदीवली, 90 फुट रोड येथील त्रिमूर्ती सोसायटी परिसरात बाळकृष्ण मित्र मंडळ आणि मनराज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने चांदीवली विभागातील ज्येष्ठ समाजसेवक अनिल गलगली यांच्या मार्गदर्शनाखाली जनआरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले ज्याचा 200 नागरिकांनी लाभ घेतला. यावेळी अनिल गलगली, मनोज नाथानी, एड कैलास आगवने, रत्नाकर शेट्टी, बाबू राऊत, अनिल दिवटे, श्रीमती मोसीना शेख, किशोर ढमाळ, महेश ढमाळ, अक्षय कागदे, प्रदीप साबळे, स्वप्निल जगताप, रोहित कोळी, संतोष गौडा उपस्थित होते.







