भारत पाक सामना होण्याआधी धोनी आणि राहुलला मॅच हरण्याची होती ऑफर; पहा संपूर्ण व्हिडीओ

दुबई : भारत-पाकिस्तान यांच्यातील हाय होल्टेज सामना सुरू होण्यासाठी आता अवघे काही तास उरले असतांना २३ ऑक्टोबरला काहीजणांनी टीम इंडियाचा मेंटर एम.एस. धोनी आणि फलंदाज के.एल. राहुल यांना मॅच हारण्याची खुली ऑफर दिली होती. त्याचा मजेशीर व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

सराव केल्यानंतर दोघेही मैदानावरून हॉटेलकडे जात असताना हा प्रकार घडला. धोनीनेही त्याच्यासमोर आलेल्या या प्रस्तावाला चोख प्रत्युत्तर दिले आहे. टीम इंडिया आपला सराव संपवून परतत असताना पाकिस्तानची अँकर सवेरा पाशाने हे क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. तिची नजर पहिल्यांदा के.एल. राहुलवर पडली. राहुलला पाहताच पाकिस्तानी अँकरने त्याला ‘पाकिस्तानविरुद्ध चांगली फलंदाजी करू नको,’ अशी विनंती केली. सवेरा राहुलला म्हणाली की, कृपया, उद्या चांगला खेळू नकोस.’ पाक अँकरने २-३ वेळा विनंती केल्यानंतर राहुलने तिच्याकडे पाहिलं आणि हसत पुढे निघून गेला.

भारतीय खेळाडूंसोबत हसतखेळत काही क्षण घालवल्यानंतर पाकिस्तानी पत्रकार सवेराने आपल्या संघातील खेळाडूंशी संवाद साधला. तिने आपल्या संघाला भारताविरुद्धच्या सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या. पाकिस्तानी संघ प्रशिक्षणानंतर हॉटेलमध्ये परतत असतानाही हा प्रकार घडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here