कडेवर मुलाला घेऊन आई पोहचली पोलिसाचे कर्तव्य करायला; मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

भोपाळ (मध्यप्रदेश) : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी. त्यांनी एका आईचे कर्तव्य तसेच पोलिसांचे कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्याचे फोटोच्या माध्यमातून कौतुक केले. हा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत असून, या फोटोचे कौतुकही होत आहे.

महिला अधिकाऱ्याने आपल्या दीड वर्षाच्या मुलीला बेबी केरीयर बॅगमधून अंगावर बांधले होते. त्यांची ड्युटी मुख्यमंत्र्यांच्या हेलिपॅडजवळ होती. या दरम्यान, जेव्हा मुख्यमंत्री परत जाऊ लागले, तेव्हा त्यांची नजर महिला पोलीस अधिकाऱ्यावर पडली, त्यानंतर त्यांनी त्यांच्याकडे जाऊन तिचे कौतुक केले. यासोबतच त्यांनी महिला पोलिस अधिकारी यांचा फोटोही ट्विट केला आहे.

शिवराज सिंह चौहान यांनी फोटो ट्विट करून लिहिले की, ‘अलिराजपूर भेटीदरम्यान, मी ड्युटीवर असलेल्या डीएसपी मोनिका सिंग यांना त्यांच्या दीड वर्षाच्या मुलीला बाळाच्या वाहक बॅगेत घेऊन जाताना पाहिले. त्यांचे कर्तव्याप्रती असलेले समर्पण वाखाणण्याजोगे आहे. मध्य प्रदेशला तुझा अभिमान आहे. मी तिला शुभेच्छा देतो आणि लाडली बिटीयाला आशीर्वाद देतो. ‘

मोनिका सिंग असे या महिला पोलिस अधिकाऱ्याचे नाव असून त्या मध्यप्रदेशच्या धार जिल्ह्यात पोलिस उपअधीक्षक (डीएसपी) म्हणून ड्यूटीवर होत्या . याबाबत बोलतांना त्या म्हणाल्या की, मंगळवारी सकाळी जेव्हा त्या आपल्या ड्युटीसाठी जात होत्या, तेव्हा त्यांची मुलगीही उठली आणि सोबत येण्याचा आग्रह केला. त्या म्हणाल्या, ‘मला आई म्हणून जबाबदारी पार पाडायची होती आणि पोलिस अधिकारी म्हणून माझे कर्तव्यही पार पाडायचे होते.’ त्यामुळे मी तिला सोबत घेऊन आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here