नाशिक (प्रतिनिधी दिनेश लोंढे) : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सामाजिक न्याय मंत्री भारत सरकार नामदार रामदास आठवले यांच्या आदेशाने राज्याचे नेते प्रकाश लोंढे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने नाशिक विभागाचे महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले.
रिपाईचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख तथा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. या निवेदनात महाराष्ट्र राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये अनुदान द्या, पेट्रोल डिझेल गॅस च्या किमती त्वरित कमी करा, राज्यात महिलांवरील होणारे अन्याय-अत्याचार त्वरित थांबवावे, ओबीसी मराठा मुस्लिम समाजाला तात्काळ आरक्षण द्या, मागासवर्गीय कुटुंबांवरती होणारे अत्याचार त्वरित थांबवा आदी मागण्या मांडण्यात आल्या आहेत.
याप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख तथा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे,रिपाई नाशिक महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मा.गुंफाताई भदरगे, जिल्हा नेते सुनिलभाऊ निकम,आंबेडकरी चळवळीतील युवा नेते विक्रांत गांगुर्डे, सामाजिक कार्यकर्ते समाधान जावरे, नम्रताताई निकम, उमेश चव्हाण, प्रशांत गांगुर्डे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते






