धुळे (विशेष प्रतिनिधी) – स्वाभिमानी मराठी पञकार संघाचा राज्यभर विस्तार करून लेखणीच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडली जाईल, असे प्रतिपादन संस्थापक अध्यक्ष रामकृष्ण नेरकर यांनी केले. पञकार संघाची नवीन कार्यकारिणी तयार करण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी धुळ्यात 8 आॅगस्ट रोजी स्वाभिमानी मराठी पञकार संघाची बैठक झाली.
या बैठकीत नवीन कार्यकारिणी तयार करणे, पञकारांसाठी घरकुल योजना राबविणे, पञकारांवरील हल्ले रोखण्यासाठी शासनाला निवेदन देणे, पञकार संघाचे कार्यालय बांधण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणे, धुळे शहरात लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी फाशीपूल, लेनीन चौकात जागा उपलब्ध करुन देण्यासाठी महानगरपालिकेला निवेदन देणे आदी निर्णय घेण्यात आले. पञकार संघाची नवीन कार्यकारिणी लवकरच जाहिर केली जाणार आहे.
या बैठकीला पञकार संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय चव्हाण, युवराज पाटील, शांताराम निकम, ज्ञानेश्वर सोनवणे, संजय मरसाळे, बंडु गांगुर्डे, राजाभाऊ उमाळे, चंद्रगुप्त खैरनार, देवेंद्र बनसोडे, सिध्दार्थ सोनवणे, विनायक अहिरे, सुनील विभांडीक, प्रकाश लोहार, बबलु नवगिरे, नरेश गवळे, राहुल वाघ, यशोवर्धन नगराळे, संदिप देवरे, भानुदास महाजन, अमोल बैसाणे आदी उपस्थित होते.







