समीर वानखेडे यांच्या समर्थनार्थ रिपब्लिकन पक्षाचे आज आंदोलन

मुंबई (प्रतिनिधी चेतन किर्दत) : एनसीबीचे कर्तबगार प्रामाणिक अधिकारी समीर वानखेडे यांच्या समर्थनासाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार मुंबई प्रदेश रिपब्लिकन पक्षाच्यावतीने मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांच्या नेतृत्वात आज दुपारी 2 वाजता मुंबईत आझाद मैदान येथे निदर्शन आंदोलन करण्यात येणार आहे.

एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे हे गेली अनेक वर्षे प्रामाणिकपणे काम करीत आहेत. कोणताही भ्रष्टाचाराचा आरोप त्यांच्यावर नाही. ड्रग्सच्या विळख्यातून युवा पिढीला वाचविण्याचे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे करीत आहेत.त्यामुळे त्यांचे मनोधैर्य खचू नये म्हणून मागासवर्गीय अधिकाऱ्यांच्या पाठीशी रिपब्लिकन पक्ष ठामपणे उभे आहे.

समीर वानखेडे यांच्या समर्थनासाठी रिपब्लिकन पक्षातर्फे आज आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती गौतम सोनवणे यांनी दिली आहें.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here