पोलीस व सैनिकांमध्ये दुजाभाव नको

पोलीस व सैनिकांमध्ये दुजाभाव नको

पोलिसांच्या वेतनात तात्काळ वाढ व्हावी

संदिप कसालकर

संपूर्ण देशभरात सध्या कोरोना या विषाणू ने थैमान घातले आहे. याच पार्श्वभूमीवर अक्षरशः अहोरात्र मेहनत करून जीवाची पर्वा न करता फक्त जनसमुदाय सुरक्षित राहावा यासाठी आपले पोलीस झटत आहे. त्यात पोलिसांना कोरोना बाधित होण्याच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे आणि हे खरंच चित्तथरारक आहे.
या सर्व व्यापात पोलिसांना सैनिकांप्रमाणे सन्मान का मिळत नाही आहे ? अश्या कठीण प्रसंगी तरी पोलिसांना आर्थिक स्वरूपात जर का अतिरिक्त फायदा मिळाला तर त्यात काय हरकत आहे ? असे बरेच विषय घेऊन सध्या “पुलिस की आवाज” ही संघटना केंद्रीय सरकार कडे निवेदन करण्याच्या तयारीत आहे.
“पुलिस की आवाज” या संघटनेचे संस्थापक पाल पंधारी यांनी देशभरातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये कार्यकारिणी स्थापित केली आहे. समाजात पोलिसांप्रती असणारे गैरसमज दूर व्हावेत यासाठी “पुलिस की आवाज” चे संपूर्ण भारतातील पदाधिकारी तसेच कार्यकर्ते हे रोड शो या सारखे जनजागृतीचे कार्यक्रम करीत आहेत.
महाराष्ट्रात जर म्हटलं तर “पुलिस की आवाज” चे महाराष्ट्र प्रभारी महेंद्र तिवारी तसेच राष्ट्रीय मीडिया प्रभारी तसेच महाराष्ट्र अध्यक्ष संदिप कसालकर यांनी मुंबईतील पोलीस ठाण्यातील कर्तव्य बजावणारे पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी यांना मास्क, सॅनिटायझर, पाणी, चहा वितरित करून कोरोना च्या महामारीत एक खारीचा वाटा म्हणून मदत म्हणून पुढाकार घेतला आहे.
तसेच संपूर्ण देशभरात पोलिसांना सैनिकांप्रमाणे सन्मान मिळावा तसेच कर्तव्य बजावत असताना पोलिसांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत तसेच पोलिस निरोगी राहावेत यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत असे “पुलिस की आवाज” चे संस्थापक पाल पंधारी यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here