भर रस्त्यात अचानक पेटली पीएमपीएमएल बस

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : पिंपरी चिंचवडमध्ये पीएमपीएल बसने अचानक पेट घेतल्याची घटना घडली असून, चालकाने प्रसंगावधान राखल्याने ३० प्रवाश्यांचे प्राण वाचले आहेत.

पिंपळे गुरव येथून पुण्याच्या दिशेने बस जात होती त्यावेळेस दापोडी पुलावर अचानक धुर येऊ लागल्याने बस थांबवण्यात आली आणि प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. त्यानंतर काही मिनिटातच बसने पेट घेतला. यामध्ये चालकाने प्रसंगावधान राखल्याने प्रवाशांना कोणतीही हानी पोहचली नाही.

पिंपळे गुरव या ठिकाणाहून एमएच-१२, एचबी १४३८ सीएनजी ही बस पुण्याकडे जात होती. दरम्यान, बसच्या इंजिनमध्ये शॉटसर्किट होऊन धुर येत असल्याने चालक लक्ष्मण हजारे यांनी रस्त्याच्या कडेला थांबवली. तात्काळ चालक आणि वाहक यांनी प्रवाशांना बसमधून खाली उतरवले. त्यानंतर मोठ्या प्रमाणात धूर येऊन बसने पेट घेतला.

दरम्यान, ही घटना बुधवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास घडली आहे. येथे तात्काल अग्निशमन जवानांनी घटनेस्थळी येऊन आग नियंत्रणात आणली. पुणे आणि पिंपळे गुरव येथे दोन्ही ठिकाणी काही काळ वाहनांची गर्दी झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here