जळगाव (निलेश पाटील) – निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठान,फ़ूड बैंक चे रसत्यावरिल निराधार आजी-आजोबाना जेवण देण्याचे कार्य अखंडित पणे सुरु आहे ,आजचे जेवण पहिल्या टप्यात,रेल्वे स्टेशन,कोर्ट चौक,नवी पेठ येथे जयेश रवींद्र येवले,अमळनेर यांच्यातर्फे त्यांच्या वाढदिवसा निमित्त वाटप करण्यात आले व दुसऱ्या टप्यात सिव्हील हॉस्पिटल , सिंधी कॉलनी येथील आजी आजोबांना व अंध अपंगांना सौ मनीषा पाटील यांच्या कडून त्यांच्या वाढदिवसानिमित्त निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठान,फ़ूड बैंक च्या वतीने वाटप करण्यात आले. याठिकाणी जेवण वाटप करताना प्रतिष्ठानचे धीरज जावळे व सुलतान पटेल उपस्थित होते







