जळगाव (संपादक सुनिल पाटील) : सणांचा राजा म्हटल्या जाणाऱ्या दिवाळीतील फराळाची अपुर्वाई सगळ्यांनाच असते. पण गृहिणींना या दिवाळीला फराळाचा कोणता नवा पदार्थ करायचा? हा सदोदित पडणारा प्रश्न लक्षात घेऊन नवजीवन प्लसने शेफ विष्णू मनोहर यांच्या रेसिपी गृहिणींसाठी क्यूआर कोडच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या होत्या. या उपक्रमाला शहरातील गृहिणींनी उदंड प्रतिसाद दिला असून, याबाबत सकारात्मक प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत.
सातत्याने आपल्या ग्राहकांसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या नवजीवन प्लसतर्फे जागतिक किर्तीचे शेफ विष्णू मनोहर यांच्या सहकार्याने खास त्यांच्या अनुभवाच्या मुशीतील दिवाळीतील फराळाच्या रेसिपी क्यू.आर.कोडच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या होत्या. आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीत एकाहून एक चविष्ट पदार्थांची ‘रेसिपी’ सांगणारे सेलिब्रिटी शेफ विष्णू मनोहर यांच्या या व्हिडीओंच्या माध्यमातून मिळालेल्या रेसिपींचा आम्हांला खूपच फायदा होणार असल्याची प्रतिक्रिया अनेक महिलांनी खास नवजीवन प्लसच्या स्टोअरला भेट देवून दिल्या.
नवजीवन प्लसच्या बहिणाबाई गार्डन व महाबळ चौकातील स्टोअर्सला भेट देवून, गुणवत्तापूर्ण उत्पादनांवर असलेल्या महाबचत ऑफर्सचा लाभ घेऊन, आपला खरेदीचा आनंद द्विगुणीत करावा, असे आवाहन नवजीवन प्लसचे अनिल कांकरिया यांनी केले आहे.






