काळया बाजारात जाणारा ३० टन सरकारी तांदूळ पकडला ; चौघांवर गुन्हा

यावल (तालुका प्रतिनिधी डॉ.मोहन साळुंके) : शिधापत्रिकेवर वितरित होणारा तांदूळ काळ्याबाजारात जास्त दराने विक्री करणारा ट्रक चोपडा-यावल मार्गे गोंदिया येथे जात असल्याची गोपनीय माहिती पो नि सुधीर पाटील यांना २३ ऑक्टोबररोजी मिळाली.

या माहितीची तात्काळ दखल घेत स फौ मुझफ्फर खान समशेर खान, पो हे कॉ असलम खान, चालक रोहिल गणेश, पो कॉ सुशील घुगे यांच्यासह पथक यावल-चोपडा रोडवर हॉटेल केसर बागजवळ तपासणीसाठी थांबले. दुपारी तांदुळाने भरलेला ट्रक ( क्र एमएच १८ एसी ८४७) येताना दिसून आला. पोलिसांनी ट्रक थांबवून तपासणी केली असता. त्यात ५ लाख ८८ हजार रुपये किमतीचा रेशनिंगचा तांदूळ असल्याचे आढळून आले. ट्रक चालकाने उडवाउडवीचे उत्तर दिली.

ट्रकचालकाची कसून चौकशी केली असता हा तांदूळ पंकज मुरलीधर वाणी ( रा. चोपडा ) यांच्या सांगण्यावरून संतोष प्रभाकर वाणी, निलेश राजेंद्र जैन ( रा. कापडणे ता.जि.धुळे ) यांच्या कापडणे येथील गोडाऊन मधून ३० टन तांदूळ भरून भंडारा येथील गितीका पराबोलिक इंडस्ट्रीज येथे जात असल्याचे सांगितले. यावल पोलिसांनी ट्रक ताब्यात घेऊन जमा केला आहे ट्रकचालक केदार मुरलीधर गुरव (वय-३८, रा. आकाश गार्डन समोर, शहादारोड, शिरपुर ) याला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी कापडणे येथील कल्याणी विनायक इंडस्ट्रीज येथील गोडाऊनला भेट दिली त्या ठिकाणी शासनाचे वापरण्यात येणारे बारदान आढळून आले दोन महिन्यात १७० टन तांदूळ काळाबाजारात विक्री केला असल्याची माहिती समोर आली आहे. स फौ मुझफ्फर खान समशेर खान यांच्या फिर्यादीवरून पंकज वाणी , निलेश जैन, संतोष पाटील आणि केदार गुरव या चार जणविरोधात यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पो नि सुधीर पाटील करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here