शर्लिन चोप्राचा समीर वानखेडेंना पाठिंबा

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : क्रूझ ड्रग्ज प्रकरण रोज नवीन वळणांचा सामना करत आहे. बॉलिवूडचे अनेक बडे कलाकार शाहरुख खानला पाठिंबा देत आहेत. दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्रा क्रूझ ड्रग्ज प्रकरणाचा तपास करणारे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना समर्थन देताना दिसून आली.

तिने त्यांच्या प्रामाणिकपणे काम करण्याचे कौतुकदेखील केले आहे. शर्लिनच्या मते, क्रूझ ड्रग्ज प्रकरण लवकरात लवकर संपवण्यात आले पाहिजे नाहीतर युवा पिढीवर वाईट संस्कार होतील. समीर वानखेडे योग्यरितीने काम करत आहेत. त्यांना त्यांच्या पद्धतीने काम करू द्या.

नवाब मलिकांनी समीर वानखेडेंवर केलेल्या आरोपावर शर्लिन चोप्राने प्रश्न उपस्थित केले असून, या आरोपावर शर्लिन चोप्रा म्हणाली,”समीर वानखेडे त्याचं काम करत आहेत. युवा पिढीच्या भल्यासाठी त्यांच्यावर कोणतीही बंधन न लादता त्यांना काम करू दिले पाहिजे. तसेच तसेच तरुणांनी नशा करणं टाळायला हवं. समीर वानखेडेंचे मॅरेज सर्टिफिकेट आणि ड्रग्ज प्रकरण याचा संबंध काय?”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here