मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : स्टॅण्डअप कॉमेडियन सुनील ग्रोव्हर सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ते अनेकदा त्याच्या सोशल मिडीया अकाऊंटवरून मजेदार व्हिडिओ शेअर करुन आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करत असतात. नुकताच त्यांनी एका तळीरामाचा व्हिडिओ शेअर केला असून, हा व्हिडीओ पाहणारे सर्व यूजर्सचे खूप मनोरंजन झाले आहे. हा व्हिडिओ शेअर करत सुनील ग्रोव्हर यांनी या व्हिडीओला ‘मिशन इम्पॉसिबल’ असे मजेशीर कॅप्शन दिले असून, मिशन इम्पॉसिबलचे पार्श्वसंगीतदेखील वापरले आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक मद्यधुंद तळीराम पडलेली सायकल उचलून चालवण्याचा प्रयत्न करत दिसत आहे. तो सायकल व्यवस्थित उचलतो, ती उभी करतो, आणि चालविण्याचा प्रयत्न करतो. अवघे काही अंतरावर गेल्यावर पुन्हा सायकलीसह पडतो, मात्र हार न मानता पुन्हा उभे राहण्याचा प्रयत्न करतो. ह्या व्हिडीओच्या पार्श्वभूमीवर एक बोर्ड दिसत आहे. ज्यावर लिहलं आहे, देशी दारुचं दुकान.
तीन दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओला आत्तापर्यंत २ लाख ७२ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले असून, ही संख्या सातत्याने वाढत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अभिनेत्री आणि बिग बॉस फेम गौहर खान देखील स्वतःला प्रतिक्रिया देण्यापासून रोखू शकली नाही.






