नवी दिल्ली (उपसंपादक राजन षाकया) : दिल्ली विद्यापीठाचे निवृत्त प्रोफेसर दाम्पत्याने आत्महत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. ते दिल्लीतील गोमती अपार्टमेंटमध्ये राहत होते. त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या मृतदेहाजवळ सुसाइड नोट मिळाली आहे.
राकेश कुमार जैन आणि उषा जैन अशी या पतीपत्नीची नाव असल्याचं सांगितलं जात आहे. ते दिल्लीतील गोमती अपार्टमेंटमध्ये राहत होते. त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. राकेश यांचं वय ७४ तर पत्नीचं वय ६९ होतं. दोघेही दिल्ली विद्यापीठात प्रोफेसर होते. एका रस्ते अपघातात दोघांना मल्टीपल फ्रॅक्चर झालं होतं. यानंतर दोघांना त्रास होऊ लागला. ते अंथरूणाला खिळून होते.
बुधवारी दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या जवळ एक सुसाइड नोट सापडली आहे. यात त्यांनी सुसाइडचं कारण सांगितलं. सुसाइड नोटमध्ये त्यांनी लिहिलं होतं की, रस्ते अपघातात त्यांना मल्टिपल फ्रॅक्चर झालं होतं. यानंतर त्याचं जीवन अवघड झालं होतं. ते आपल्या जीवनाला कंटाळले होते. यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला.






