धुळे (.विशेष प्रतिनिधी) – सप्तशृंगी महिला संस्था धुळे मार्फत आदर्शगाव वडगाव येथे प्रेरक उपक्रमांतर्गत सार्वजनिक ओटा,आणि
स्मार्ट ग्राम योजनेअंतर्गत जलशुध्दीकरण प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा खासदार डॉक्टर सुभाष भामर आणि प्राध्यापक अरविंद जाधव ,मालेगाव भा. ज.पा.जिल्हाध्यक्ष निकुंभ सरसंस्था अध्यक्ष मीना भोसले,कृषी विभाग मंडळकृ षी अधिकारी पोतदार,सरपंच विमलबाई बापू भिल,ग्रामसेवक चेतन पाटील यांच्या ,ग्रमकर्यकर्ता नाना अर्जुन पाटील,कैलास पाटील यांच्या उपस्थितीत सोशल distansting चे पालन करून पार पडला.
लोकार्पण सोहळ्यात उपस्थित प्रत्येक व्यक्तीचे आॅक्सिजन चे प्रमाण,तापमान तपासण्यात आले,तसेच प्रत्येक व्यक्तीस मास्क देण्यात आला.माननीय खासदार डॉक्टर भामरे यांनी कृषी विभाग,एनजीओ,आणि ग्रामपंचायत एकत्र येऊन खूपच चांगल्या रीतीने काम करत आहे.आणि समाज ओटा काम खरोखरच कौतुकास्पद आहे.आणि आरोग्य हा सगळ्यात महत्वाचं मुद्दा आहे.हा मुद्दा लक्षात ठेऊन या गावात स्मार्ट गाव योजने अंतर्गत संपूर्ण गावाला पाच रुपयात २० लिटर शुध्द पाणी ATM machine द्वारे पिण्यास मिळत आहे.याचा विशेष आनंद व्यक्त केला,गावाला स्मार्ट ग्राम पुरस्कार, तंटामुक्त गाव पुरस्कार आसे मनाचे सहा पुरस्कार मिळाले आहेत.आणि पुरस्कारांची पूर्ण रक्कम विकास कामासाठी वापरली जाते.आणि म्हणूनच हे गाव धुळे जिल्ह्यातील आदर्श गाव प्रकल्प योजनेतील पाहिले गाव नक्कीच होणार अशी खात्री देखील व्यक्त केली.
अरविंद जाधव यांची गावातील लोकांना आज जरी आपले गाव करोना मुक्त आहे. मात्र ते कायमस्वरूपी करोना मुक्त राहणार यासाठी प्रयत्न करायचे आहेत,सगळ्यांनी मास्क चा वापर केला पाहिजे,sanitiour चा वापर केला पाहिजे असे आपल्या मार्गदर्शन पर भाषणात सांगितले.कार्यक्रमात खासदार साहेबाच्या हस्ते करोना योद्धा सन्मान पत्राचे वितरण झाले,यात धुळे येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बाविस्कर,गोकुळ देवरे,चंचल पवार,ग्रामसेवक चेतन पाटील,बंडू पाटील,नाना पाटील,जगदीश पाटील,कैलास पाटील आदीचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेतन पाटील ग्रामसेवक वडगाव यांनी केले तर आभार प्रदर्शन मीना भोसले यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कृषी विभाग,ग्रामपंचायत आणि संस्था कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Home उत्तर महाराष्ट्र धुळे आदर्श वडगाव येथे स्मार्ट ग्राम योजनेअंतर्गत जलशुध्दीकरण प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा







