वणी बसस्थानक परिसरात ४२ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार; चौघे आरोपी पोलिसांच्या ताब्यात

नाशिक (विशेष प्रतिनिधी) : जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील वणी येथे बसस्थानक परिसरात महिलेवर चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी मध्यरात्री १ वाजेदरम्यान घडली आहे. याप्रकरणी ४ संशयितांविरोधात वणी पोलीस स्थानकात बलात्कार व अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील वणी गावात ४२ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना काल (बुधवारी) रात्री घडली आहे. पीडित महिला ही मेडिकलवर गेलेली होती. त्यानंतर बसस्थानक परिसरातील निर्मनुष्य असलेल्या भागात लघुशंकेला ही महिला गेल्यानंतर याच परिसरातील संशयितांनी जीवे मारण्याची धमकी देत या महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

पीडित महिलेच्या फिर्यादीवरून ४ संशयितांविरोधात वणी पोलीस स्थानकात बलात्कार व अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सामूहिक बलात्कार घटनेतील चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे..या घटनेनंतर नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी वणी गावातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here