पंधरा वर्षाच्या मुलाने केला पाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार

औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) : येथील पुंडलिकनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका सोसायटीत पंधरा वर्षीय मुलाने सायकल खेळण्याचा बहाणा करून पाच वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणी पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घरात खेळत असणाऱ्या पाच वर्षांची चिमुकलीला सायकल खेळण्याचे आमिष दाखवून पंधरा वर्षीय मुलगा त्या मुलीला घरापासून काही अंतरावर घेऊन गेला. त्याने मुलीला चारचाकी वाहनांच्या मधोमध घेऊन जात अश्लिल चाळे करायला सुरुवात केली. हा संपूर्ण प्रकार पाहून मुलगी घाबरून गेली. यावेळी काही अंतरावरून जात असलेल्या महिलेचे लक्ष त्या मुलाकडे गेले. ते पाहून मुलाने घटनास्थळावरून पळ काढला. घडलेला संपूर्ण प्रकार मुलीने आईवडिलांना सांगितला. मुलीच्या वडिलांनी तत्काळ पुंडलिक नगर पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली.

दरम्यान, दुसऱ्या दिवशी पुंडलिक नगर पोलिसांनी पीडितेचे घर गाठून संपूर्ण प्रकार ऐकून घेतला. यावेळी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये संपूर्ण घटना कैद झाली होती. आरोपीचा शोध घेऊन पोलिसांनी त्याच्या वडिलांना बोलावले. आपला मुलगा असं काहीच करू शकत नाही असे मुलाच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी घटनेचे सीसीटीव्ही फुटेज दाखवताच मुलाच्या वडिलांनी डोक्याला हात लावला. याप्रकरणी पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here