पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात पंच असलेला के. पी. गोसावी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. पुणे पोलिसांनी आज पहाटे त्याला बेड्या ठोकल्या.
गोसावीवर नोकरी मिळवून देण्याच्या नावाने पैसे लुबाडल्याचा फसवणुकीचा गुन्हा दाखल होता. तो क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात चर्चेत आल्यानंतर पीडित विद्यार्थी समोर आले होते. तेव्हापासून गोसावी फरार होता.
अखेर पुणे पोलिसांनी आज पहाटे त्याला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी आज त्याला कोर्टात हजर केलं असता कोर्टाने त्याला आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.






