डॉक्टर असल्याचे सांगून महिलेवर बलात्कार

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : डॉक्टर असल्याचे भासवून आरोपीने २९ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. तसेच आपले म्हणणे ऐकले नाही तर अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. पुण्यातील विमानतळ पोलिस स्टेशनमध्ये यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी नायक रुद्रा रमेशराव उर्फ किशन रमेशराव जाधव (वय ३३) याला अटक केली असून, याबाबत पोलिसांनी अशी माहिती दिली अशी की, आरोपीने आपण ससून हॉस्पिटलमध्ये डॉक्टर असल्याचे पीडित महिलेला सांगितले. तसेच स्वतःचे नर्सिंग कॉलेज आणि फार्मसी कॉलेज असल्याचे सांगून विमाननगर परिसरातील फ्लॅटमध्ये तक्रारदार महिलेला बोलावून घेतले. तिथे त्याने पीडित महिलेला खोटे आयकार्ड आणि वैद्यकीय डिग्रीचे बनावट कागदपत्रे दाखवून ती खरी असल्याचे भासविले. त्यानंतर पीडितेच्या कौटुंबिक वादाचा फायदा घेऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तिच्यासोबत घरामध्ये जबरदस्तीने लग्नही केले. त्यानंतर पीडितेच्या नातेवाईकांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून १६ लाख ६५ हजार रुपये घेऊन फसवणूक केली.

दरम्यान काही काळानंतर पीडितेला आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर तिने आरोपीला प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर आरोपीने तू माझे ऐकले नाही तर अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करेल, अशी धमकी दिली. तसेच पीडितेच्या पतीला जीवे मारण्याची आणि नोकरी लावण्यासाठी घेतलेल्या पैशाच्या व्यवहारांमध्ये अडकिवण्याची धमकी दिली. सुरुवातीच्या काही काळात बदनामी होईल या भीतीने पीडितेना तक्रार दिली नव्हती. परंतु आरोपीकडून होणारा त्रास असह्य झाल्याने पीडितेने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here