हाय प्रोफाइल वेश्याव्यवसायावर पोलिसांची धाड, तिघांवर गुन्हा दाखल

sex-racket

अहमदनगर (प्रतिनिधी) : केडगावमधील अंबिकानगर व सावेडी उपनगरातील वाणीनगर येथील हाय प्रोफाइल वेश्याव्यवसायावर छापा टाकून पोलिसांनी तिघांना अटक केली, तर तीन परप्रांतीय महिलांची सुटका केली. पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने ही कारवाई केली.

वाणीनगर, तसेच अंबिकानगर येथे हाय प्रोफाइल वेश्याव्यवसाय चालविला जात असल्याची माहिती उपअधीक्षक संदीप मिटके यांना मिळाली. त्याप्रमाणे तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीतील वाणीनगर, तसेच कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील अंबिकानगर परिसरात बनावट ग्राहक पाठवून पंचांसमक्ष पोलिसांनी छापा टाकून तीन परप्रांतीय महिलांची सुटका केली. वाणीनगर येथील एका फ्लॅटमध्ये वेश्याव्यवसाय सुरू होता.

याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंकी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दीपक एकनाथ लांडगे (वय ३०, रा. ब्राह्मण गल्ली), रिक्षाचालक सागर जाधव (पूर्ण नाव माहीत नाही) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका परप्रांतीय महिलेची सुटका करण्यात आली. दुसरी कारवाई केडगाव उपनगरातील अंबिकानगर येथे करण्यात आली. येथे एका बंगल्यात वेश्याव्यवसाय चालविला जात होता. येथे छापा टाकून दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली. पोना शाहिद शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून योगेश पोपट ओव्होळ (रा. माळीवाडा, नगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाचवेळी दोन ठिकाणी छापा टाकण्याची ही पहिलीच वेळ आहे.

पोलीस अधीक्षक मनोज पाटील, उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संपत शिंदे, ज्योती गडकरी, उपनिरीक्षक समाधान सोळंकी, राजेंद्र आरोळे, सुरेश औटी, तरटे, अमोल शिरसाट, चेतन मोहिते, गौतम सातपुते, सचिन जाधव, शाहिद शेख, विष्णू भागवत, सुमित गवळी, दीपक रोहकले, जयश्री सुद्रिक, प्रियंका भिंगारदिवे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here