मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : शिवसेना प्रणित शिव सामर्थ सेना हिंदू हृदयसम्राट,सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, युवा सेना अध्यक्ष, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाने व नगरसेवक सुरेश तुकाराम पाटील यांच्या सल्ल्यानुसार आज शिवसेना भवन दादर येथे मुंबई जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका जाहीर करण्यात आल्या.
या नेमणुकांमध्ये मुंबई जिल्हा सरचिटणीस पदी अमोल ज्ञानदेव वंजारे,मुंबई जिल्हा मीडिया प्रमुख पदी मयुरेश सूर्यकांत मोहिरे यांना पदे देण्यात आली त्याप्रसंगी शिवसेना पश्चिम महाराष्ट्र समन्वयक, माजी आमदार दगडू दादा सकपाळ यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले तसेच संघटनेचे अध्यक्ष संदीप भोज, सचिव अवि राऊत, सरचिटणीस जितेंद्र दगडू सकपाळ यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले,
यावेळी शिव सामर्थ्य सेनेचे मुंबई अध्यक्ष सिद्धेश सूर्यकांत मोहिरे,UHRC चे मुंबई सचिव सचिन जोइजोडे, सूर्यकांत शांताराम मोहिरे, सौ.सुजाता सूर्यकांत मोहिरे,सौ.प्रिया सिद्धेश मोहिरे,अक्षय दिलीप आडाव व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.






