कारंजा (तालुका प्रतिनिधी हफीज खान) : येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे श्रीकांत ठाकरे यांच्या नेतृत्वात लोटांगण आंदोलन करण्यात आले सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून शेतकरी आज मरणाच्या दारात उभा आहे या पावसामुळे व परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं उरलेले पीक वाहून गेले त्याची अजूनपर्यंत सरकारने दखल घेतली नाही म्हणून हे आंदोलन करण्यात आले होते.
या आंदोलनवेळी जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अतिवृष्टीग्रस्तांना हेंक्टरी ५०,००० तात्काळ मदत देण्यात यावी, या वर्षाचा १०० टक्के पीक विमा मंजूर करावा, कोरोना काळात अवाढव्य बिल आकारुन सुरु असलेली लूट थांबवून शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबवावी, सोयाबीन चा प्रति किंटल भाव किमान ८५०० रु व कापसाचा प्रति क्विं.१२००० रु स्थिर राहावा यासाठी केंद्र सरकारने तात्काळ धोरण आखावे आदी मागण्या करण्यात आल्या.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे श्रीकांत ठाकरे यांच्या नेतृत्वात लोटांगण आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात श्रीकांत ठाकरे, भारत भगत, रितेश पाडर, कृष्णा ठाकरे, विठ्ठल आमले, मोहन कदम, गजानन अंमदाबाकर, गणेश सराफ, गौरव जमले, नाशिर, विशाल ठाकरे, चेतन सावरकर, खटके यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.






