किरण गोसावी विरोधात पुणे पोलिसांत आणखी चार तरुणांच्या तक्रारी

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : परदेशात नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने अनेक तरुणांची फसवणूक करणारा आरोपी किरण गोसावीच्या विरोधात पुणे पोलिसांकडे आणखी चार तरूणांच्या तक्रारी दाखल केल्या आहेत.किरण गोसावी मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी आणि आर्यन खान अटक प्रकरणातील एनसीबीचा पंचही आहे.

किरण गोसावीने परदेशात नोकरी लावण्याच्या बहण्याने या तरुणांची फसवणूक केली असून पोलिसांनी चारही तरुणांना गोसावी विरोधात तक्रार अर्ज देण्यास सांगितले. तक्रार करणारे 3 तरूण लष्कर परिसरातील असून, एक वानवडी परिसरातील रहिवासी आहे. या चार जणांचे अर्ज आल्यावर पुढील कायदेशीर कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पालघर जिल्ह्यातील एडवण येथील दोन तरुणांची फसवणूक केल्याप्रकरणी किरण गोसावी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केळवे सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दोन तरुणांना मलेशियात नोकरीनिमित्त पाठवण्यासाठी दीड लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. उत्कर्ष तरे आणि आदर्श तरे या दोन तरुणांची गोसावींनी फसवणूक केल्याचा दावा केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here