परळी येथे गांजाची सामूहिक शेती करणाऱ्या दोघांना अटक

बीड (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील परळी तालुक्यात गांजाची सामूहिक शेती होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.एकीकडे राज्यात अमली पदार्थाचे अनेक प्रकरण सुरू असतानाच बीड जिल्ह्यातील परळीत मात्र गांजा सर्रास शेतात पिकवला जात असल्याची ही दुसरी घटना समोर आली आहे.

काही वर्षांपूर्वी परळी तालुक्यातील मोहा या गावात शेकडो एकरावर अफूची सामूहिक शेती होत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. यानंतर शंभर पेक्षा अधिक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले होते.

आता याच तालुक्यात गांजाची शेती आढळून आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. परळी मतदारसंघातील हाळंब या गावात गांजाची सामूहिक शेती केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ग्रामीण पोलिसांनी या शेतीवर छापा घातला असता सामूहिक गांजाची लागवड केल्याचे दिसून आले. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here